शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi National Anthem: राहुल गांधींच्या सभेत भारताच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं भलतंच गाणं, नंतर झाली पळापळ, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 12:08 IST

गीत वाजताच राहुल गांधीही गोंधळून इकडेतिकडे पाहू लागले

Rahul Gandhi National Anthem: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. काल रात्री राहुल यांची वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे एक सभा पार पडली. या सभेत एक विचित्र प्रकार घडला आणि त्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपा आणि सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आले. एका व्हिडीओनुसार, राहुल गांधींच्या सभेत भारताच्या ऐवजी काहीतरी वेगळेच गीत वाजल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील वाशिममध्ये राहुल गांधींचा हा कार्यक्रम झाला. तेथे मंचावरून भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यास सांगण्यात आले. राहुल गांधींसह सर्वजण राष्ट्रगीतासाठी उभे राहिले होते. पण त्यानंतर जे घडले ते फारच विचित्र होते.

राहुल गांधी यांच्या सभेच्या वेळी राष्ट्रगीत लावले जाणार होते. सारेच जण राष्ट्रगीतासाठी सज्ज होते. पण तशातच एक वेगळेच संगीत सुरू झाले. भारताच्या राष्ट्रगीताऐवजी त्या सभेत वेगळ्याच प्रकारचे गीत सुरू झाले. सहसा चुकून लावले जाणारे गीत हे एखाद्या चित्रपटाचे गीत वैगेरे लागू शकते. पण त्या सभेत मंचावर चक्क नेपाळचे राष्ट्रगीत वाजू लागले. सुरुवातीची काही सेकंदे केवळ संगीत होते, त्यानंतर जेव्हा शब्द सुरू झाले त्यावेळी राहुल गांधींच्या ही बाब लक्षात आली की हे भारताचे राष्ट्रगीत नाही. त्यानंतर त्यांनी  लगेचच स्टेजजवळ उभ्या असलेल्या नेत्यांना हे गीत थांबवण्यास सांगितले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भाजपा नेते अतुल भातखळकरांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

--

राहुल गांधींनी नेत्यांना नेपाळचे राष्ट्रगीत थांबवण्यास सांगत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे, मात्र राहुल गांधींना काय म्हणायचे आहे हे नेत्यांना सुरूवातीला समजलेच नाही. यावर भाजपाने राहुल गांधींवर निशाणा साधला. 'ज्या मूर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना ओळखेल कसा? हा डोक्यावर पडलेला आहे, तरीही त्याला डोक्यावर घेणारे जोकर या देशात आहेत,' असे भातखळकरांनी ट्विटमध्ये म्हटले. तर महाराष्ट्राचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत, 'पप्पू की कॉमेडी सर्कस' म्हटले आहे. भाजपाचे तामिळनाडूचे नेते अमर प्रसाद रेड्डी यांनीही हा व्हिडिओ ट्विट करून राहुल गांधींना विचारले आहे की, हे काय आहे? हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरही यूजर्सने राहुल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाTrollट्रोल