शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:28 IST

Rahul Gandhi vs PM Modi, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपा-मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं' या घोषणेवरून राहुल यांचा जोरदार हल्लाबोल

Rahul Gandhi vs PM Modi, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं तो सेफ हैं' या घोषणेवर जोरदार हल्ला चढवला. सोमवारी त्यांनी धारावी प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. वास्तविक, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वांसमोर तिजोरी ठेवली. त्यावर लिहिले होते, 'एक हैं तो सेफ हैं'. त्यांनी तिजोरीतून दोन पोस्टर बाहेर काढले. त्या पोस्टवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले.

तिजोरीतील दोन पोस्टर्स कसली होती?

तिजोरीतील एका पोस्टरवर धारावीचा नकाशा होता आणि त्यावर शिंदे सरकारवर टीकेची तोफ डागण्यात आली होती. तर दुसऱ्या पोस्टवर एका बाजूला उद्योगपती गौतम अदानी दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांचा एकमेकांना नमस्कार करतानाचा फोटो होता. हा फोटो दाखवून राहुल गांधी म्हणाले की, हाच आहे पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं' घोषणेचा अर्थ. 'एक हैं तो सेफ हैं' हे घोषवाक्य मी तुम्हाला समजावून सांगितले आहे. एक कोण आहेत?- नरेंद्र मोदी जी, अदानी, अमित शाह हे ते लोक आहेत. सेफ कोण आहेत? अदानीजी सुरक्षित आहेत. आता त्रास होत असेल तर तो धारावीतील जनतेलाच असेल. त्यात काही नुकसान झाले तर तो धारावीतील जनतेचे असेल. धारावीमध्ये भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांचे मोठे जाळे आहे, पण एका व्यक्तीच्या फायद्यासाठी नष्ट होत आहेत. हे नुकसान थांबवायला हवे, अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपाच्या घोषणेची खिल्ली उडवली.

"महाराष्ट्राची निवडणूक ही विचारधारांची निवडणूक आहे. ही एक किंवा दोन अब्जाधीश आणि गरीब यांच्यातील निवडणूक आहे. अब्जाधीशांना मुंबईची जमीन त्यांच्या हातात जायला हवी आहे. अब्जाधीशांना एक लाख कोटी रुपये देण्याची योजना आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब, बेरोजगार, तरुणांना मदतीची गरज आहे, असा आमचा विचार आहे. आम्ही प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा करू, महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोफत बस प्रवास असेल, ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, आम्ही सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ७ हजार रुपये जाहीर केले आहेत. आम्ही तेलंगणा, कर्नाटकात जी जात जनगणना करत आहोत, ती महाराष्ट्रातही करणार आहोत", असेही मत त्यांनी मांडले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीdharavi-acधारावीGautam Adaniगौतम अदानीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा