शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi vs Ashish Shelar: "राहुल गांधींकडून महाराष्ट्र अन् मराठी माणसाचा अपमान, आता आदित्य ठाकरे गप्प का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 17:35 IST

भाजपाच्या आशिष शेलारांचा सवाल

Rahul Gandhi vs Ashish Shelar: राहुल गांधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा (Savarkar) जाणूनबुजून अपमान करत आहेत. तो सावरकरांचा आणि देशभक्त भारतीयांचा अपमान आहे. ज्या महाराष्ट्रात या सुपुत्राचा जन्म झाला त्या महाराष्ट्राचा अपमान राहुल गांधी करत आहेत. एक मराठी माणूस ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली, जो कुणापुढे झुकला नाही, त्या सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठी माणासाचा अपमान आहे, असा घणाघाती आरोप भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.

"सावरकरांच्या बाबतीत अपमानास्पद जेवढे काही करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. केवळ कालचं विधान नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांचे नोकर होते हे बदनामीकारक आहे पण त्याहीपेक्षा भयंकर काँग्रेसच्या अधिकृत मासिकामध्ये काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर हे समलैंगिक होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निष्ठा, श्रद्धा आणि देशप्रेम याच्यावर जेवढे आक्रमण करता येईल तेवढे काँग्रेसने केले आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाणूनबुजून अपमान करत आहेत. तो सावरकरांचा आणि देशभक्त भारतीयांचा अपमान आहे," असे शेलार म्हणाले.

"ज्या महाराष्ट्रात  या सुपुत्राचा जन्म झाला त्या महाराष्ट्राचा अपमान राहुल गांधी करत आहेत. एक मराठी माणूस ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची सजा भोगली. त्या सावरकरांचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे मराठी माणसाचा अपमान काँगेस करते आहे आणि शिवसेना सत्तेसाठी माती खात आहे. बोटचेपी भूमिका घेत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मणीशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला कानशिलात जोडे मारले आणि भारत जोडो अभियानामध्ये आदित्य ठाकरे झप्पी मारत आहेत. आता आदित्य ठाकरे गप्प का आहेत? आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध का करत नाहीत?" असा सवालही त्यांनी केला.

"विपर्यासाचे राजकारण शिवसेना उद्धव ठाकरे गट करत आहे. इतिहास, मराठी माणूस, महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही. या देशातील कोणताही देशभक्त नागरिक शिवसेना उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना माफ करणार नाही. महाराष्ट्राच्या अपमानाबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष आहे," असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीAshish Shelarआशीष शेलारVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर