शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

राहुल गांधी कधीच नेतृत्व करु शकत नाहीत, त्यासाठी मोदींसारखं...; बावनकुळेंनी सांगितला फरक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 11:04 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा १५० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे.

नागपूर-

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा १५० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. भाजपाच्या या यशावर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त करत गुजरातच्या जनतेचे आभार व्यक्त केले. तसंच गुजरातचा निकाल संपूर्ण देशासाठी महत्वाचा असल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संघटनात्मक कौशल्याचा हा विजय असल्याचंही ते म्हणाले. बावनकुळे यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. 

"गुजरातमध्ये काँग्रेसची धूळधाण उडाली आहे. मी याआधीही सांगितलं होतं राहुल गांधी कधीच नेतृत्व करू शकत नाहीत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस कधीच जिंकू शकत नाही. त्यासाठी मोदींसारखं स्वत:ला देशाला समर्पित करावं लागतं. पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासासाठी स्वत:ला देशाला समर्पित केलं आहे", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

गुजरातचा निकाल ऐतिहासिक आणि विरोधकांचे डोळ उघडणारा"गुजरातच्या जनतेनं मोदींवरचा विश्वास कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. इतकंच नाही, तर यावेळीचं यश गुजरात निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात मोठं यश ठरताना दिसत आहे. जगात भारताला महाशक्तीशाली बनवण्याच्या मोदींच्या प्रयत्नांचं हे यश आहे. गुजरातमध्ये भाजपानं केलेल्या कामांना जनतेनं दिलेली ही पावती आहे. आता तरी या निकालातून विरोधकांचे डोळे उघडतील", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे