राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार
By Admin | Updated: May 8, 2015 10:33 IST2015-05-08T10:03:41+5:302015-05-08T10:33:35+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार आहेत.

राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार आहेत. याप्रकरणाच्या सुनावणीसाठी अनुपस्थित राहण्याची सूट सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिली होती. मात्र न्यायालयाचा मान राखण्यासाठी ते भिवंडी कोर्टात हजर राहणार आहेत, असे ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले. आज सकाळी त्यांचे मुंबईत आगमन झाले असून ते भिवंडीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महात्मा गांधींची हत्या केली, अशा आशयाच्या विधान राहुल यांनी केले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरुद्ध भिवंडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बदनामी खटला सुरू आहे. दरम्यान या खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली.