‘रग्गेडियन आॅब्स्टेकल रेस’ रविवारी
By Admin | Updated: February 19, 2015 23:39 IST2015-02-19T23:31:03+5:302015-02-19T23:39:39+5:30
देश-विदेशांतील स्पर्धकांचा सहभाग

‘रग्गेडियन आॅब्स्टेकल रेस’ रविवारी
कोल्हापूर : लष्करी प्रशिक्षणाप्रमाणेच खडतर, अडथळ्यांची १५ किलोमीटर इतकी दूर देशातील सर्वांत मोठी ‘रग्गेडियन आॅब्स्टेकल रेस’ ही स्पर्धा रविवारी (दि. २२) सकाळी आठ वाजता सादळे-मादळे येथील निसर्ग रिसॉर्ट येथे होणार आहे, अशी माहिती ‘कासा’चे अध्यक्ष आकाश कोरगावकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरगावकर म्हणाले, या स्पर्धेत १५ किलोमीटरमध्ये लष्कराप्रमाणे १५ प्रकारचे अडथळे निर्माण केले आहेत. स्पर्धकाला धावण्यासह चिखलातून जाणे, तारेखालून रांगत जाणे, दोरीच्या साहाय्याने चढार्ई करणे, जाळीमधून जाणे, टायर क्रॉस, वजन उचलून धावणे, आगीवरून उडी मारणे, असे अनेक प्रकारचे अडथळे या स्पर्धेत निर्माण केले आहेत. अशा प्रकारची ही देशातील आव्हानात्मक स्पर्धा पहिल्यांदाच कोल्हापुरात होत आहे. यात शालेय आणि खुल्या गटांत एकूण ३५० स्पर्धक सहभागी होणार आहेत. यात ८० हून अधिक महिला आहेत. स्पर्धेतून वेगळा थरार कोल्हापूरकरांना अनुभवता आणि पाहता येणार आहे. पत्रकार परिषदेस अमोल कोरगावकर, रवींद्र प्रभू, राहुल गायकवाड, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मायकल लेनिंग, अमर सुब्बाचा सहभाग
या स्पर्धेत जर्मनीतील आयर्न मॅन मायकल लेनिंग, हिमालयात ४४० किलोमीटर धावण्याचा विश्वविक्रम नोंदविलेला सिक्कीम येथील अमर सुब्बा आणि नृत्यचंद्रिका संयोगीता पाटील, आदी सहभागी होणार आहेत.