एकतेसाठी धावणार आरएएफचे जवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 02:49 IST2016-10-31T02:49:33+5:302016-10-31T02:49:33+5:30

शीघ्र कृती दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या वतीने सोमवारी सकाळी आठ वाजता ‘रन फॉर युनिटी’ही मिनी मॅरेथॉन आयोजित केली

RAF troop will run for unity | एकतेसाठी धावणार आरएएफचे जवान

एकतेसाठी धावणार आरएएफचे जवान


कळंबोली : सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शीघ्र कृती दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या वतीने सोमवारी सकाळी आठ वाजता ‘रन फॉर युनिटी’ही मिनी मॅरेथॉन आयोजित केली आहे. यामध्ये तीनशे जवान धावणार आहेत. मॅरेथॉनचे प्रायोजक लोकमत माध्यम आहे.
मॅरेथॉला शीघ्र कृती दलाच्या कॅम्पसपासून सुरुवात होणार आहे. ती तळोजा मध्यवर्ती कारागृह, सेक्टर-३५ येथून पुन्हा शीघ्र कृती दलाच्या क्रीडांगणावर सांगता होणार आहे. एकूण पाच कि.मी अंतराच्या या मॅरेथाँनमध्ये एकता, समभावाचा संदेश दिला जाणार आहे.
यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पश्चिम क्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक राजकुमार, उप महानिरिक्षक संजीव शर्मा, कमांडन्ट राकेश चौधरी, आरएएफचे कमांडन्ट आर.डब्ल्यू दावा, उप कमांडन्ट हेमंत कुमार उपस्थित राहणार आहेत. कॅन्सरपिडीत ७० जवानांसोबत शनिवार व रविवारी दिपावली साजरी करण्यात आली. यानिमित्त फराळ त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
(प्रतिनिधी)

Web Title: RAF troop will run for unity