‘रॅडिको’कडून काळ्या पाण्याची शिक्षा!
By Admin | Updated: June 23, 2015 02:23 IST2015-06-23T02:23:38+5:302015-06-23T02:23:38+5:30
शेंद्रा औद्योगिक वसाहतीत मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅडिको एनव्ही डिस्टीलरी कंपनीमुळे कुंभेफळ, टाकळी वैद्य आणि टाकळी शिंपी या गावांतील शेतकरी

‘रॅडिको’कडून काळ्या पाण्याची शिक्षा!
विनोद काकडे / संजय देशपांडे, औरंगाबाद
शेंद्रा औद्योगिक वसाहतीत मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅडिको एनव्ही डिस्टीलरी कंपनीमुळे कुंभेफळ, टाकळी वैद्य आणि टाकळी शिंपी या गावांतील शेतकरी व रहिवासी ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा भोगत आहेत. कंपनीतून निघणारे ‘स्पेंटवॉश’ हे घातक रसायन शेतात, विहिरीत रातोरात सोडल्याने जमिनी करपून गेल्या आहेत. दहा फूट खोलीपर्यंत याचा परिणाम झाला आहे.
‘मद्य कारखान्याने सुखना धरणात कालवले विष’ हे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच सर्वत्र खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुखना नदीचा सर्वे केला. पोलिसांनीही रॅडिको कंपनीला नोटीस बजावली. या कंपनीकडून लाल रंगाचे रसायनमिश्रित विषारी पाणी थेट सुखना धरणात सोडले जाते. शिवाय काळ्या रंगाच्या ‘स्पेंटवॉश’ या घातक रसायनाची विल्हेवाट टँकरमधून लावली जात आहे. कुंभेफळ, टोणगाव, टाकळी वैद्य, टाकळी शिंपी परिसराला याचा फटका बसत आहे.