‘राधे माँ’ला अटकपूर्व जामीन नाही पोलीस चौकशी होणार

By Admin | Updated: August 14, 2015 02:16 IST2015-08-14T02:16:14+5:302015-08-14T02:16:14+5:30

‘राधे माँ’चा अटकपूर्व जामीन गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे राधे माँ यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. शिवाय त्रिशुलसह विमानप्रवास करत असल्याने

'Radhe Maa' will not be arrested in anticipation before police inquiry | ‘राधे माँ’ला अटकपूर्व जामीन नाही पोलीस चौकशी होणार

‘राधे माँ’ला अटकपूर्व जामीन नाही पोलीस चौकशी होणार

मुंबई : ‘राधे माँ’चा अटकपूर्व जामीन गुरुवारी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे राधे माँ यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. शिवाय त्रिशुलसह विमानप्रवास करत असल्याने त्यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी लेखी तक्रार अ‍ॅड. राजकुमार लक्ष्मण यांनी विमानतळ प्राधिकरणाला केलेली आहे.
निक्की गुप्ता यांची तक्रार तथ्यहिन व आधारहिन आहे. तसेच त्यांचा विवाह २०१२ मध्ये झाला असून त्यांनी उशिरा तक्रार केली आहे आणि राधे माँ यांच्या सांगण्यावरून छळ झाल्याचा एकही पुरावा नाही. तेव्हा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी ‘राधे माँ’तर्फे करण्यात आली.
गुप्ता यांच्या कुटुंबात राधे माँ च्या सांगण्यावरूनच सर्वकाही केले जाते. त्यामुळे त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. चौकशीतून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात, असा दावा गुप्ता यांचे वकील सन्नी वासकर यांनी केला. पोलिसांनीही राधे माँ यांना चौकशीसाठी समन्स पाठवल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने अर्ज फेटाळला.

Web Title: 'Radhe Maa' will not be arrested in anticipation before police inquiry