राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या साखर कारखान्यात स्फोट, २ ठार

By Admin | Updated: April 6, 2016 13:03 IST2016-04-06T13:03:27+5:302016-04-06T13:03:47+5:30

लोणी प्रवरानगर भागातील प्रवरा साखर कारखान्यात उसाची मळीच्या टाकीचा भीषण स्फोट होून २ ठार तर १०-१२ जण जखमी झाले.

Radhakrishna Vikhe-Patil's sugar factory exploded, 2 killed | राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या साखर कारखान्यात स्फोट, २ ठार

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या साखर कारखान्यात स्फोट, २ ठार

>ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. ६ - विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रवरा साखर कारखान्यात उसाची मळीच्या टाकीचा भीषण स्फोट झाला असून त्यात २ कामगार मृत्यूमुखी पडले तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत. लोणी प्रवरानगर भागात बुधवारी सकाळी ११च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
दरम्यान जखमींना उपचारांसाठी प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 
हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. 
 

Web Title: Radhakrishna Vikhe-Patil's sugar factory exploded, 2 killed