काँग्रेसच्या गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड
By Admin | Updated: November 10, 2014 12:56 IST2014-11-10T11:15:22+5:302014-11-10T12:56:07+5:30
माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपद विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे.
गटनेता ठरवण्यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. त्यावेळीच गटनेता निवडीचे सर्व अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आले होते. गटनेतेपदासाठी बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात चुरस होती. अखेर आज विखे-पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले.
सेनेतर्फे खडसेंना हिरवी टोपी भेट
मराठी शाळांमध्ये उर्दू शिकवणा-या शिक्षकांची भरती करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासाठी हिरव्या रंगाची मुस्लिम टोपी भेट म्हणून आणली. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी आलेल्या रावते यांनी खडसेंच्या निर्णयाचा निषेध करत आपण त्यांना ही टोपी भेट देणार असल्याचे सांगितले.