शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 19:41 IST

काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होऊन नव्यांना संधी द्यावी.

अहमदनगर - काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होऊन नव्यांना संधी द्यावी. काँग्रेस पक्षात आता चिंतन करण्याचा सुध्दा विषय संपला असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी संगमनेरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. माजी खासदार अशोक चव्हाण आणि आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावरही विखे यांनी टीका केली.  निळवंडे कालव्यांच्या प्रश्नासाठी गेली अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पक्षविरहीत संघर्ष केला. त्याचे हे यश आहे. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांनी जिरायती भागातील पाणी प्रश्नांबाबत मांडलेली भूमिका प्रत्यक्षात उतरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने बोलावलेल्या बैठकीत झालेले निर्णय महत्वपूर्ण आहेत. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केलेले सहकार्य आणि ज्येष्ठ नेते माजीमंत्री मधुकर पिचड यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे हे यश आहे, असेही विखे म्हणाले.भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकीलोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी? याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही राधाकृष्ण विखे म्हणाले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपा