रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य मंत्रिपदाला रिपाइंचा विरोध
By Admin | Updated: July 8, 2016 01:34 IST2016-07-08T01:34:48+5:302016-07-08T01:34:48+5:30
भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य मंत्रिपदाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने विरोध केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात चव्हाण यांना मंत्रिपद दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र

रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य मंत्रिपदाला रिपाइंचा विरोध
मुंबई : भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य मंत्रिपदाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने विरोध केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात चव्हाण यांना मंत्रिपद दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला.
खरात म्हणाले की, कामाचा वार्षिक अहवाल सादर करताना चव्हाण यांनी दलितांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर विविध पक्ष व संघटनांनी चव्हाण यांच्याविरोधात मोर्चे व आंदोलने केली होती. अशा आमदाराला मंत्रिपद दिल्यास आंबेडकरी जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल. (प्रतिनिधी)