रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य मंत्रिपदाला रिपाइंचा विरोध

By Admin | Updated: July 7, 2016 22:51 IST2016-07-07T22:51:22+5:302016-07-07T22:51:22+5:30

भारतीय जनता पार्टीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य मंत्रिपदाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने विरोध केला आहे

Rabindra opposition to Rabindranath Chavan's potential minister | रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य मंत्रिपदाला रिपाइंचा विरोध

रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य मंत्रिपदाला रिपाइंचा विरोध

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७  : भारतीय जनता पार्टीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य मंत्रिपदाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने विरोध केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला आहे.
खरात यांनी सांगितले की, कामाचा वार्षिक अहवाल सादर करताना चव्हाण यांनी दलितांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर विविध पक्ष आणि संघटनांनी चव्हाण यांच्याविरोधात मोर्चे आणि आंदोलने केली होती. त्यामुळे अशा जातीयवादी आमदाराला मुख्यममंत्र्यांनी मंत्रिपद दिल्यास आंबेडकरी जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल. तसे झाल्यास आंबेडकरी जनतेच्या
रोषाला मुख्यमंत्र्यांना सामोरे जावे लागेल, अशा इशाराही खरात यांनी दिला आहे.

Web Title: Rabindra opposition to Rabindranath Chavan's potential minister