आर. आर. पाटील यांची प्रकृती गंभीर
By Admin | Updated: January 19, 2015 13:00 IST2015-01-19T12:55:20+5:302015-01-19T13:00:46+5:30
राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे वृत्त आहे. पाटील यांच्यावर तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

आर. आर. पाटील यांची प्रकृती गंभीर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे वृत्त आहे. पाटील यांच्यावर तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे.
पाटील यांच्या तोंडात झालेल्या गाठीवर काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लीलावती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मोठय़ा प्रमाणावर लोक भेटीला येत होते. त्यामुळे त्यांना इन्फेक्शन झाले. परिणामी त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले.