शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

R. R. Patil: मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? आर. आर. पाटील यांच्या लेकीची भावूक पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 10:33 IST

R. R. Patil News: २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आर. आर. पाटील यांनी केलेला गावाचा शेवटचा दौरा आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांबाबत आबांची लेक Smita R R Patil यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

मुंबई - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाची आठवण आजही काढली जाते. आबांनी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे दाखले आजही दिले जातात. फेब्रुवारी २०१५ रोजी आर. आर. पाटील यांचे आजारपणामुळे अकाली निधन झाले होते. दरम्यान, २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आर. आर. पाटील यांनी केलेला गावाचा शेवटचा दौरा आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांबाबत आबांची लेक स्मिता पाटील यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

पप्पांचा शेवटचा दिवस! असे शिर्षक देऊन स्मिता पाटील यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यात त्या म्हणतात की, आज ८ नोव्हेंबर. बरोबर ७ वर्षे झाली माझ्या वडिलांना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन! आजच्या दिवशी २०१४ मध्ये सकाळी ११ वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय, असे पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.

३ नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी घणाघाती भाषण केले होते. या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते. त्यानंतर ६ नोव्हेंबरला पप्पा अंजनीला घरी आले. हेलिकॉप्टरमधून सगळं गाव त्यांनी दोन-दोनदा फिरून पाहिले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत. त्याचप्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांकडे पाहून जात असत. पण त्यादिवशी मात्र पप्पा जाताना लोकांमधून वेळ काढून मी आणि माझी बहिण सुप्रिया हिला भेटण्यासाठी आमच्या रूममध्ये आले. पप्पांनी त्यादिवशी वर येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली. त्याक्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आम्ही दोघी बहिणीही विचार करू लागलो की,  पप्पांना काय वाटले असावे, की पप्पांनी मिठ्ठी मारली आणि पप्पांच्या डोळ्यात का पाणी आले असावे? पण आम्हाला वाटलेही नव्हते की, आज पप्पांनी आम्हाला शेवट चे कुशीत घेतले आहे, अशी आठवण स्मिता पाटील यांनी जागवली.

त्यांनी पुढे लिहिले की, त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारुती-शंकराचेही न चुकता दर्शन घेतले होते. स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा! आता आणखी किती सत्कार करणार? कदाचित मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? असा भावूक प्रश्न स्मिता पाटील यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFamilyपरिवार