आर. के. लक्ष्मण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By Admin | Updated: January 27, 2015 15:28 IST2015-01-27T15:22:55+5:302015-01-27T15:28:47+5:30
ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आर. के. लक्ष्मण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ऑनालाइन लोकमत
पुणे, दि. २७ - ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आर. के. लक्ष्मण यांच्या सन्मानार्थ त्यांचे स्मारक उभारु अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली.
'कॉमन मॅन'चे जनक आर. के. लक्ष्मण यांचे सोमवारी संध्याकाळी पुण्यात निधन झाले. फुफ्फुस आणि किडनीच्या विकाराने त्यांना ग्रासले होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.लक्ष्मण यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव सिंबॉयसिसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर शासकीय इतमामात पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.