ओला टॅक्सीसह पसार झालेली चौकडी गजाआड

By Admin | Updated: August 4, 2016 20:24 IST2016-08-04T20:24:07+5:302016-08-04T20:24:07+5:30

वडाळा परिसरातून ओला टॅक्सीसह पसार झालेल्या चौकडीला मुंबईच्या मालमत्ता कक्षासह नंदुरबार पोलिसांनी अटक केली. या प्रवासा दरम्यान त्यांनी २ गुन्हे केले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे

Quoted excursions along the Ola taxi | ओला टॅक्सीसह पसार झालेली चौकडी गजाआड

ओला टॅक्सीसह पसार झालेली चौकडी गजाआड

मुंबई गुन्हे शाखेसह नंदुरबार पोलिसांची कारवाई
प्रवासादरम्यान केले २ गुन्हे
मुंबई : वडाळा परिसरातून ओला टॅक्सीसह पसार झालेल्या चौकडीला मुंबईच्या मालमत्ता कक्षासह नंदुरबार पोलिसांनी अटक केली. या प्रवासा दरम्यान त्यांनी २ गुन्हे केले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अहमद कादर शेख (२२), अक्रम इक्बाल खान (२६), जाहिर खान (२७), वकार हुसेन खान (२४) अशी अटक त्रिकुटांची नावे आहेत. चौघही मुंब्रा येथील राहिवासी आहेत.
भायखळा येथील रहिवासी असलेले प्रवीण होनप यांनी नुकतीच स्विफ्ट डिझायर विकत घेतली होती. त्यात रोजगारासाठी त्यांनी ही गाडी ओला कंपनीसाठी लावली होती. २४ जुलै रोजी त्यांना ओलातून भायखळा पूर्वेकडून पश्चिमेसाठीचे भाड्यासाठीचा कॉल आला होता. त्यानुसार त्यांनी चार प्रवाशांना घेत पश्चिमेच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान आरोपींनी त्यांना वडाळा फ्री- वेच्या दिशेने गाडी नेण्यास सांगितली. तेथून पुढे एका निर्जन स्थळी गाडी थांबवून होनपवर वार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तावडीतून सुटका करत होनपने तेथून पळ काढला.

या त्रिकुटाने ओला कारसह तेथून पळ काढला. याप्रकरणी वडाळा टी.टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला. याप्रकरणी गुन्हे शाखेचे मालमत्ता कक्ष देखील समांतर तपास करत होते. या तपासादरम्यान अशाप्रकारे ठाण्यातील राबोडी,भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात देखील गुन्हे झाल्याचे समोर आले. मालमत्ता कक्षाचे सहायक्क पोलीस निरिक्षक दिप बने यांना त्यांच्या गुप्तमाहितीदारांकडून सदर गुन्ह्यांतील आरोपी मुंब्रा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बने यांच्या पथकाने अधिक तपास सुरु केला. मुंब्रा परिसरात सापळा रचून यातील मास्टरमाईंड असलेल्या अहमदच्या मुसक्या आवळल्या. अहमद

हा अभिलेखावरील आरोपी असून २१ जुलै रोजी चोरीच्या गुन्ह्यांतून तो जामिनावर बाहेर आला होता.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत या आरोपींचा प्रताप समोर आला. जाहिर, वकार आणि अक्रमच्या मदतीने त्याने वडाळयातून होनप यांची ओला कार चोरी केली. या ओला कारसह त्यांनी मध्यप्रदेश गाठले. दरम्यान कार मध्येच बंद पडली, शिवाय जवळील पैसेही संपल्याने त्यांनी कार तेथेच सोडून मारुती आल्टोची जबरी चोरी केली. याप्रकरणी ३ आॅगस्ट रोजी मानपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेथून नाशिकला जात असताना त्यांचा नंदुरबार परिसरात अपघात झाला. या अपघाताप्रकरणी नागरिकांनी त्यांना नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात दिले. नंदुरबार पोलिसांनी त्यांना अपघातप्रकरणी अटक केली. तर यातील अहमदने त्यांच्या तावडीतून पळ काढत मुंब्रा गाठले. मात्र बने यांच्या पथकाने शिताफिने त्याला अटक केली.
लवकरच मुंबई पोलीस अन्य तिघांचा ताबा घेणार आहे.
.............
ओला टॅक्सी टार्गेटवर
मुंब्रा येथील असलेल्या या टोळीने ओलाच्या चालकांना टार्गेट केले होते. चोरीतील मोबाईलच्या वापर करुन ते ओला टक्सी बुक करत होते. त्यानंतर चालकाला निर्जन स्थळी नेऊन त्याची लूट करत गाडीसह पसार व्हायचे. अशाप्रकारे फसवणूकीचे त्याच्याविरोधात राबोडी, नारपोली आणि वडाळा टी.टी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Quoted excursions along the Ola taxi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.