‘त्या’ उत्तरपत्रिकांमध्ये झालेली गुणवाढ

By Admin | Updated: May 9, 2015 01:13 IST2015-05-09T01:13:26+5:302015-05-09T01:13:26+5:30

पोलिसांनी सुचविल्याप्रमाणे अमरावती विद्यापीठातील चौकशी समितीने ४५ उत्तरपत्रिकांची तपासणी केली. पैकी ३ उत्तरपत्रिकांमध्ये गुणवाढ झाल्याचे स्पष्ट झाले

The quintet of 'those' answer sheets | ‘त्या’ उत्तरपत्रिकांमध्ये झालेली गुणवाढ

‘त्या’ उत्तरपत्रिकांमध्ये झालेली गुणवाढ

अमरावती : पोलिसांनी सुचविल्याप्रमाणे अमरावती विद्यापीठातील चौकशी समितीने ४५ उत्तरपत्रिकांची तपासणी केली. पैकी ३ उत्तरपत्रिकांमध्ये गुणवाढ झाल्याचे स्पष्ट झाले. तसे पत्र विद्यापीठाकडून फे्रजरपुरा पोलिसांना गुरुवारी प्राप्त झाले. आता त्या तीनही उत्तरपत्रिका जप्त करून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते यांच्या तक्रारीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी २१ फेब्रुवारी रोजी नऊ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी युद्धपातळीवर तपासकार्य सुरू केल्यावर दररोज नवीन तथ्यांचा उलगडा होत आहे.
तपासकार्यात पोलिसांनी १६ आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत चौकशी केली. त्यामधील जॉबवर्कर महेंद्र दमकेची चौकशी सुरू आहे. त्याने आणखी चार विद्यार्थ्यांची नावे पोलिसांना सांगितली
होती.
दमकेने दिलेल्या माहितीवरून, चारही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे कार्य पोलिसांनी विद्यापीठाकडे सोपविले. या अनुषंगाने विद्यापीठातील चौकशी समितीने ४५ उत्तरपत्रिका तपासणीचे कार्य हाती घेतले
होते. (प्रतिनिधी)

Web Title: The quintet of 'those' answer sheets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.