दाभोसा धबधब्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न

By Admin | Updated: July 26, 2014 23:17 IST2014-07-26T23:17:15+5:302014-07-26T23:17:15+5:30

निसर्गाने मनमुराद उधळण केलेल्या काही ठिकाणांपैकी एक म्हणजे जव्हार. साहजिकच ठाणो जिल्हय़ाचे महाबळेश्वर म्हणून आज जव्हारची खास ओळख आहे.

The question of the security of Dabhosa waterfall | दाभोसा धबधब्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न

दाभोसा धबधब्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न

हुसेन मेमन - जव्हार
निसर्गाने मनमुराद उधळण केलेल्या काही ठिकाणांपैकी एक म्हणजे जव्हार.  साहजिकच ठाणो जिल्हय़ाचे महाबळेश्वर म्हणून आज जव्हारची खास ओळख आहे. पूर्वीच्या तुलनेत खूप मोठय़ाप्रमाणात जंगलतोड येथे झाली असल्याने त्याचा पर्यावरणावरही परिणाम झाला आहे, येथील धबधबेही निसर्गसौंदर्यात भर घालत असून सुरक्षेच्यादृष्टीने मात्र प्रश्न वा:यावरच आहे.
पर्जन्यवृष्टीचे प्रमाण येथे कमालीचे घटले आहे. सिमेंटच्या जंगलांचा विळखा शहराभोवती पडत असल्याने उन्हाळय़ात पूर्वीसारखा गारवा आज नाही. तरीही आसपासच्या तालुक्यांपेक्षा जव्हारचे हवामान आजही उन्हाळय़ात आल्हाददायक असते हे नक्की. तसेच पर्जन्याचे प्रमाण कमी झाले असले तरी पावसाळय़ातले जव्हार आजही पर्यटकांना भुरळ पाडते यात तिळमात्र शंका नाही. जव्हार आज प्रामुख्याने ओळखले जाते ते येथील दाभोसा या निसर्गरम्य आणि विलोभनीय धबधब्यामुळे. 
जव्हार, तलासरी, सिल्वासा या मार्गावरील दाभोसा जव्हारहून साधारणत: 2क् कि.मी. अंतरावर आहे. तेथील लेंढी नदीवर दाभोसा - दादरकोपरा धबधबा आहे. धबधब्याचे डोह सुमारे 6क् ते 7क् फूट खोल आहेत. धबधब्याचे पाणी 3क्क् फूट खोल एका डोहात पडत असते. पावसाळय़ाच्या हंगामात या ठिकाणी लांब लांबहून पर्यटक येत असतात. ब:यापैकी जंगल राहिले असले तरी पावसाळय़ातील हिरवीकंच वनo्री मन मोहरुन टाकते. पावसाळय़ातले सौंदर्य वेगळेच. पण  उन्हाळय़ातही दाभोसा तितकाच आकर्षित करीत असतो. पाण्याची धार कमी कमी होत जाते, पण पर्यटकांची गर्दी तितकीच असते. काही अती उत्साही पर्यटकांमुळे हा धबधबा धोक्याचे ठिकाण ठरु लागला आहे. येथील डोहात बुडण्याच्या दुर्दैवी घटना ब:याच घडल्या आहेत. वरुन खाली उतरण्यासाठी चांगली सोय नाही. कसरत करुन तोल सांभाळून दरीत खाली उतरल्यावर पाण्याजवळ गेल्यानंतर पाण्याचा अंदाज येत नाही. तेथे संरक्षक भिंती तर नाहीच पण साधे धोकादर्शक फलकही नाहीत. मद्य प्राशन करणारे तर तेथे हमखास असतात. पण तारुण्याच्या धुंदीत विश्वाचे भान नसणारे अति उत्साही पर्यटक अलगदपणो पाण्याच्या भोव:यात अडकतात. 
 
4 दाभोसा येथे या सुविधा उपलब्ध झाल्यास महाराष्ट्रातील धबधब्यांची जी प्रसिध्द ठिकाणो आहेत, त्यात दाभोसाचा क्रमांक नक्कीच वरचा राहील, याची खात्री आहे. जव्हारचा हा धबधबा दुर्दैवी घटनांनी बदनाम होऊ नये म्हणून संबंधीत खात्यानी या ठिकाणी सुरक्षिततेचे उपाय योजणो अत्यंत गरजेचे आहे. 
 
4दाभोसा या गावापासून तर धबधब्यार्पयतचा रस्ता अत्यंत खराब आहे. पावसाळय़ात तर खूप त्रस होतो. चिखलात वाहने फसल्याने 2-3 किमीचे अंतर पायी जावे लागते. मोठय़ा लक्झरी  ट्रॅव्हल्स् बसेस तेथे जाऊ शकत नाहीत. 
4अशा या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन रस्ता दुरुस्ती देखील प्राधान्याने अपेक्षित आहे. या सर्व प्राथमिक स्वरुपाच्या बाबी आहेत. याची पूर्तता होणो गरजेचे आहे. 

 

Web Title: The question of the security of Dabhosa waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.