शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 19:06 IST

एमपीएससीतर्फे २०१७ च्या राज्यसेवा परीक्षेचा सुधारित निकाल प्रसिध्द केला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या लांबलेल्या नियुक्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. पुढील सात दिवसांत उपजिल्हाधिकारी, डी.वाय.एस.पी.,तहसीलदार आदी महत्त्वाच्या पदांचे नियुक्तीपत्र संबंधित पात्र उमेदवारांना दिले जाईल, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एमपीएससीतर्फे २०१७ चा मुख्य परीक्षेचा समांतर आरक्षणावरील सुधारित निकाल प्रसिध्द केला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.एमपीएससीतर्फे २०१७ मध्ये राज्य सेवेच्या सुमारे ४५० पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार होते. परंतु, एमपीएससीच्या निकालावर आक्षेप घेवून आरक्षित प्रवर्गाच्या महिला उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आरक्षित प्रवर्गातील महिला उमेदवार खुल्या प्रवर्गातून अर्ज करू शकतात हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे एमपीएससीकडून सुधारित निकाल जाहिर करणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे वर्षभरापासून एमपीएससीकडून यावर निर्णय घेतला जात नव्हता. त्यामुळे पात्र उमेदवारांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एमपीएससीकडून सुधारित निकाल जाहीर केला. एमपीएससीतर्फे सुधारित निकाल प्रसिध्द केल्यामुळे रखडलेल्या नियुक्तीचा प्रश्नही मार्गी लागला आहे.---एमपीएससीतर्फे २०१७ च्या राज्यसेवा परीक्षेचा सुधारित निकाल प्रसिध्द केला आहे. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना लवकरच संबंधित विभागाकडून नियुक्ती पत्र दिले जाईल. सामान्य प्रशासन विभागाकडून येत्या सात दिवसात पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल.- चंद्रशेखर ओक, अध्यक्ष, राज्य लोकसेवा आयोग

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीjobनोकरीGovernmentसरकार