पुष्पलता पाटील यांचे निधन
By Admin | Updated: August 2, 2014 03:00 IST2014-08-02T03:00:08+5:302014-08-02T03:00:08+5:30
बिहारचे राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या पुष्पलता डी. पाटील (७५) यांचे शुक्रवारी निधन झाले.

पुष्पलता पाटील यांचे निधन
नवी मुंबई : बिहारचे राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या पुष्पलता डी. पाटील (७५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी नेरूळमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुष्पलता पाटील यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्या डॉ. डी.वाय. पाटील समूहाच्या सचिव, पुष्पांजली सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा होत्या. त्यांचे ‘हास्यात रंगल्या आठवणी’ व ‘कथा पुष्पांजली’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
त्यांच्या पश्चात मुले विजय पाटील, अजिंक्य पाटील, मुली नंदिता पाटील व प्रिया पाटील असा परिवार आहे. (प्रतिनिधी)