पुरामुळे सिंहगड रस्त्यावरील वीजपुरवठा खंडित
By Admin | Updated: August 4, 2016 00:46 IST2016-08-04T00:46:58+5:302016-08-04T00:46:58+5:30
मुठा नदीला पूर आल्याने सिंहगड रोड परिसरातील सखल भागात पाणी शिरले आहे.
_ns.jpg)
पुरामुळे सिंहगड रस्त्यावरील वीजपुरवठा खंडित
पुणे : मुठा नदीला पूर आल्याने सिंहगड रोड परिसरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी ४च्या सुमारास सुरक्षिततेच्या दृष्टीने आठ रोहित्राचा वीजपुरवठा तात्पुरचा बंद करण्यात आला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर या रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
बुधवारी दुपारनंतर मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढत गेली. त्यामुळे पर्वती विभागांतर्गत एकतानगर, साईसिद्धार्थ, आनंदपार्क, विठ्ठलनगर, शारदासरोवर सोसायटी, राजपार्क सोसायटी, जलतरंग, जलविहार आदी परिसरातील सखल भागात पुराचे पाणी साचले आहे. तळमजल्यात असणाऱ्या वीजयंत्रणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आज दुपारी परिसरातील ८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. सुमारे १८०० वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मुख्य अभियंता रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप कोकणे यांनी परिसराला भेट दिली.