शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कडधान्याची हमीभावाने खरेदी, पणनमंत्र्यांची माहिती; राज्याने पाठवला केंद्र सरकारकडे प्रस्ताव

By अतुल कुलकर्णी | Updated: September 13, 2017 05:44 IST

राज्य सरकार उडीद व मुगाची हमीभावाने खरेदी करणार असून, तूर, सोयाबीन आणि भुईमूग या कडधान्यांची केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

 मुंबई : राज्य सरकार उडीद व मुगाची हमीभावाने खरेदी करणार असून, तूर, सोयाबीन आणि भुईमूग या कडधान्यांची केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.गेल्या वर्षी तूरडाळीची आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने वेळीच पावले उचलली नव्हती. परिणामी तूरडाळीचे संकट उभे राहिले होते. या प्रकारानंतर आता सरकार सर्व प्रकारच्या कडधान्यांची खरेदी हमीभावाने करणार आहे. तसा प्रस्ताव केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे पाठवला आहे.सध्या उडीद आणि मुगाची आवक सुरू झाली आहे. यंदा उडदाचे १.४८ लाख मेट्रिक टन, तर मुगाचे १.३९ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. उडदाला ५२०० अधिक २०० रुपये बोनस असा ५४०० चा हमीभाव जाहीर झाला असून, मुगाला ५३७५ अधिक २०० असा ५५७५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सोमवारी राज्यातील प्रमुख बाजारांपैकी लातूरला उडीद ४८०० रुपयांनी विकले गेले, तर अमळनेरला मुगाची ५५७५ रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाली. तुरीला ५४०० तर सोयाबीनला ३००० रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव काढला गेला आहे. त्यामुळे व्यापाºयांच्या मनमानीला चाप बसणार आहे.कमी दरात उडीद आणि मुगाची बाजारात विक्री करण्याची घाई शेतकºयांनी करू नये. खरेदी केंद्रे सुरू होईपर्यंत त्यांनी वाट पाहावी. ज्यांना तातडीने पैशांची गरज आहे, अशांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल न विकता तारण योजनेचा लाभ घ्यावा.- सुभाष देशमुख, पणनमंत्री 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी