शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Puntamba Farmer Protest: पाच वर्षांनंतर पुन्हा पुणतांब्यात शेतकरी आंदोलनाला बसणार; बैठकीत ठेवल्या चार महत्वाच्या मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 12:51 IST

२०१७ नंतर पुन्हा एकदा पुणतांबा येथे शेतकरी आंदोलनासाठी बैठक 

- मधु ओझापुणतांबा ( जि. अहमदनगर) : राहाता तालुक्यातील पुणतांबा गावात आज पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करण्यासाठी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले. २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी संपाच्या नंतर पुन्हा एकदा शेतकरी संपासाठी पुणतांबा ग्रामपंचायतच्या पटांगणात आज बैठकीचे आयोजन करून या बैठकीत आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.

शेतकरी मालाला बाजारभाव, शिल्लक राहिलेला ऊस, कांद्याचे गडगडले भाव, दुधाला रास्त भाव द्यावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले. फक्त  पुणतांबाच्या शेतकऱ्याचा विचार न करता महाराष्ट्रच्या शेतकऱ्याचा विचार करत आंदोलन करण्यात यावे. पक्षसंघटना बाजूला ठेऊन शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकऱ्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करण्याची गरज प्रत्येक शेतकऱ्यांनी बैठकीत बोलून दाखविली. लवकरच ग्रामसभा घेऊन आंदोलनाची दिशा, कमिटीची निवडीसाठी सोमवार दिनांक 23 मे ला आयोजन करण्यात आले असून प्रत्येकाने या आंदोलनाची माहिती सर्व शेतकऱ्यांना द्यायची आहे.  मागील आंदोलनात अपरिपक्व होतो, आता परिपक्व होऊन आंदोलन करण्यात येईल. डॉ. धनंजय धनवटे, सुहास वहाडणे, धनंजय धोर्डे, विठ्ठलराव जाधव, चंद्रकांत वाटेवर, नामदेवराव धनवटे, बाळासाहेब चव्हाण, सुभाष कुलकर्णी, दत्तात्रय धनवटे, सर्जेराव जाधव, राजेंद्र थोरात,अनीलराव नले, बाळासाहेब भोरकडे, कांदा, ऊस, गहू, दुधाचे दर कायम राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात उभे राहून आयात निर्यातवर नियंत्रण राहिले पाहिजे. यासाठी एकत्र येत शेतकऱ्याचे अनेक प्रश्न असून आपले मुद्दे सरकारला मांडण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

 या आहेत मागण्या 

1) कारखान्यांनी परिसरातील ऊस शिल्लक राहू देऊ नये,जो ऊस राहील त्याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने त्याच्या साठी काढलेले कर्ज, खर्च, शासनाने करावा.       2) पूर्ण दाबाने दिवसा वीज पुरवठा शासनाने करावा.       3) उसाला दोन लाख अनुदान,कांद्याला 2000रुपये नाफेडने  हमी भाव शेतकऱ्यांना मुबलक खते, कर्ज माफीची, अमलबजावणी झाली पाहिजे.        4) शेतकऱ्याचा प्रश्न आज तयार झाला नसून घटनेतील परिशिष्ट नऊ रद्द, शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव व वेतन आयोगाचा ताळमेळ बसविणे, शिल्लक ऊस बाबत साखर संघाने नियोजन करणे.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन