दहशतवादाविरुद्ध पुणेकर एकवटले

By Admin | Updated: January 18, 2016 03:46 IST2016-01-18T03:46:09+5:302016-01-18T03:46:09+5:30

दहशतवादविरोधी पथकाचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे व कुटुंबीयांना उद्ध्वस्त करण्याच्या इसिसने दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह पुणेकर नागरिक एकवटले

Punkar mobilized against terrorism | दहशतवादाविरुद्ध पुणेकर एकवटले

दहशतवादाविरुद्ध पुणेकर एकवटले

पुणे : दहशतवादविरोधी पथकाचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे व कुटुंबीयांना उद्ध्वस्त करण्याच्या इसिसने दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह पुणेकर नागरिक एकवटले.
रविवारी सकाळी विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून दहशतवादाचा निषेध केला. मुंबई पोलिसांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या पत्रामध्ये एटीएस आणि बर्गे यांना धडा शिकवणार असल्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करीत आहेत. शहरातील विविध संस्था, संघटनांच्या व्हॉट्स अ‍ॅपवरून निषेध मोर्चा काढण्याबाबत निरोप देण्यात आले. या सोबतच शहरात बॅनर्स लावण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Punkar mobilized against terrorism