हत्याप्रकरणी शिक्षा कायम

By Admin | Updated: June 27, 2016 04:37 IST2016-06-27T04:37:11+5:302016-06-27T04:37:11+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीची जाळून हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

The punishment for murder continues | हत्याप्रकरणी शिक्षा कायम

हत्याप्रकरणी शिक्षा कायम


नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीची जाळून हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. शंकर निखारे (३५) असे त्याचे नाव आहे. नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व १ हजार रुपये दंड ठोठावला होता. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. मृताचे नाव अनसूया होते. आरोपी तिचा दुसरा पती होता. ५ मे २००८ रोजी सायंकाळी शंकरने अनसूयाच्या चारित्र्यावर संशय घेऊन अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. तिचे तीनदा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यात आले. त्यात तिने घटनेची माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: The punishment for murder continues