पुण्यात नक्षलवादी नेता एटीएसकडून जेरबंद

By Admin | Updated: September 2, 2014 02:11 IST2014-09-02T02:11:35+5:302014-09-02T02:11:35+5:30

नक्षलवादी कारवाया करणा:या नक्षलवादी नेत्याला राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पुणो युनिटने कासेवाडी झोपडपट्टीमधून जेरबंद केले.

Pune's Naxalite leader was sent to ATS | पुण्यात नक्षलवादी नेता एटीएसकडून जेरबंद

पुण्यात नक्षलवादी नेता एटीएसकडून जेरबंद

पुणो : देशभक्ती युवा मंचच्या माध्यमातून नक्षलवादी कारवाया करणा:या नक्षलवादी नेत्याला राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पुणो युनिटने कासेवाडी झोपडपट्टीमधून जेरबंद केले. पुण्यातील ‘मास मुव्हमेंट’ संघटनेच्या संपर्कात राहून या तरुणांना ‘अर्बन नक्षलवादा’साठी तयार करण्याचे काम तो करीत होता.
अरुण भानुदास भेलके उर्फ शरमन जाधव उर्फ राजन उर्फ संघर्ष उर्फ आनंद (38) असे त्याचे नाव आहे. पत्नी कांचन हिच्यासह तो गेल्या वर्षभरापासून पुण्यामध्ये संजय कांबळे या नावाने राहत होता. याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशु रॉय यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. त्याला चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले. ‘मास मुव्हमेंट’च्या माध्यमातून 18 ते 22 वयोगटातील तरुणांच्या संपर्कात तो होता. त्यानुसार पोलिसांनी कासेवाडी भागात सापळा लावला.
जानेवारी 2क्क्8मध्ये चंद्रपूर पोलिसांनी नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईत 1क् जणांना अटक केली होती. त्या वेळी चिनी बनावटीची एक कार्बाईन गन व 13क् काडतुसे पोलिसांनी जप्त केली होती. अटक केलेल्या 1क् जणांमध्ये अरुण भेलके आणि कांचन यांचाही समावेश होता. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यापासून हे दोघेही फरार होते.
भेलकेच्या संपर्कात असलेल्या शुभम जगताप (18) यालाही एटीएसने ताब्यात घेतले आहे. शुभम हा दहावी झालेला असून त्याचा नातेवाइक विजय जगताप (23) हा पसार झाला आहे.
भेलके हा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईलचा वापर करीत नव्हता. तो स्वत: पीसीओवरून या तरुणांना संपर्क साधत होता. (प्रतिनिधी)

 

Web Title: Pune's Naxalite leader was sent to ATS