पुणो महापौरपदी राष्ट्रवादीचे धनकवडे

By Admin | Updated: September 16, 2014 02:32 IST2014-09-16T02:32:31+5:302014-09-16T02:32:31+5:30

महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे यांनी भाजपा उमेदवार योगेश टिळेकर यांचा तर काँग्रेसचे आबा बागुल यांनी शिवसेनेचे भरत चौधरी यांचा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पराभव केला.

Pune's Mayor of the NCP's Dhankawade | पुणो महापौरपदी राष्ट्रवादीचे धनकवडे

पुणो महापौरपदी राष्ट्रवादीचे धनकवडे

पुणो : महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे यांनी भाजपा उमेदवार योगेश टिळेकर यांचा तर काँग्रेसचे आबा बागुल यांनी शिवसेनेचे भरत चौधरी यांचा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पराभव केला. 
मनसेच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. राष्ट्रवादी व काँग्रेस नगरसेवकांची सर्व 83 मते धनकवडे व बागुल यांना मिळाली. युतीचे उमेदवार टिळेकर व चौधरी यांना 41 मते मिळाली. मनसेचे 28 पैकी 13 नगरसेवक उपस्थित होते. 
परंतु, त्यांनी मतदान न करता तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांची बहुमताने निवड झाली. चंचला कोद्रे यांच्याकडून नवनिर्वाचित महापौर धनकवडे व बंडू गायकवाड यांच्याकडून बागुल यांनी पदभार स्वीकारला. (प्रतिनिधी) 

 

Web Title: Pune's Mayor of the NCP's Dhankawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.