स्वीडनसाठी पुणे औद्योगिक व गुंतवणुकीचे ‘हब’

By Admin | Updated: February 15, 2016 04:09 IST2016-02-15T04:09:48+5:302016-02-15T04:09:48+5:30

डनसाठी पुणे हे औद्योगिक आणि गुंतवणुकीचे ‘हब’ आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेमध्ये स्वीडनचे मोठे योगदान असून, याद्वारे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होतील,

Pune's industrial and investment hub for Sweden | स्वीडनसाठी पुणे औद्योगिक व गुंतवणुकीचे ‘हब’

स्वीडनसाठी पुणे औद्योगिक व गुंतवणुकीचे ‘हब’

पुणे : स्वीडनसाठी पुणे हे औद्योगिक आणि गुंतवणुकीचे ‘हब’ आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेमध्ये स्वीडनचे मोठे योगदान असून, याद्वारे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होतील, असे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफव्हेन यांनी सांगितले.
मुंबईतील ‘मेक इन इंडिया’ सप्ताहानिमित्त भारतात आलेले पंतप्रधान लोफव्हेन यांनी शनिवारी चाकण येथील ‘एमआयडीसी’तील ‘टेट्रा पॅक’ आणि ‘एरिक्सन‘ या स्वीडिश कंपन्यांच्या प्रकल्पांना भेट दिली. त्यानंतर दोन्ही प्रकल्पांतील अधिकारी व माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. या वेळी स्वीडनचे भारतातील राजदूत हॅरॉल्ड सँडबर्ग, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागासाठीच्या स्वीडिश कॉन्सुलर जनरल फ्रेड्रिका आॅर्नब्रांट, स्वीडिश चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि ‘टेट्रा पॅक’ साउथ आशिया मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प सिंग, एरिक्सनचे भारत विभागप्रमुख पाओलो कोलेला व अध्यक्ष मॅट्स ओलसन आदी उपस्थित होते. लोफव्हेन म्हणाले, ‘भारताने ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून खूप चांगला पुढाकार घेतला आहे. भारतातील उत्पादनवाढ खूप महत्त्वाची आहे.’ (प्रतिनिधी)

Web Title: Pune's industrial and investment hub for Sweden