पुण्यातील व्यापा:याची नाशकात आत्महत्या
By Admin | Updated: September 4, 2014 01:57 IST2014-09-04T01:57:36+5:302014-09-04T01:57:36+5:30
पुणो जिल्ह्यातील धनकवडी येथील व्यापारी संतोष पुंडलीक देशमाने (33) यांनी बुधवारी दुपारी राजदूत हॉटेलमध्ये गळफ ास घेऊन आत्महत्या केली़

पुण्यातील व्यापा:याची नाशकात आत्महत्या
नाशिक : पुणो जिल्ह्यातील धनकवडी येथील व्यापारी संतोष पुंडलीक देशमाने (33) यांनी बुधवारी दुपारी राजदूत हॉटेलमध्ये गळफ ास घेऊन आत्महत्या केली़ सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास देशमाने यांनी ठक्कर बाजारसमोरील हॉटेल राजदूत हॉटेलमधील 1क्3 क्रमांकाची खोली घेतली होता़ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी रूममध्ये गळफ ास घेऊन आत्महत्या केली़ हॉटेल प्रशासनाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली़ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. संतोष देशमाने बेपत्ता असल्याची नोंद पुणो पोलिसांत आहे.
संतोष यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून मित्रंना कर्जाऊ दिलेले 13 लाख रुपये परत मिळाले नसल्याचा त्यामध्ये उल्लेख आह़े पैसे परत मिळत नसल्यानेच संतोष यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आह़े (प्रतिनिधी)