पुणेकरांचा मुख्यमंत्र्यांना ठेंगा, सोशल मीडियावरही उडाली खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 17:36 IST2017-02-18T16:54:04+5:302017-02-18T17:36:03+5:30

पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियातही खिल्ली उडवली जात आहे.

Punekar's chief minister will snag, even on social media | पुणेकरांचा मुख्यमंत्र्यांना ठेंगा, सोशल मीडियावरही उडाली खिल्ली

पुणेकरांचा मुख्यमंत्र्यांना ठेंगा, सोशल मीडियावरही उडाली खिल्ली

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १८ -  महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने प्रचारसभांचा सपाटा लागला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरमात्र पुण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. सदाशिव पेठेतील टिळक रोडवर आयोजित करण्यात आलेल्या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण मैदान मोकळं पडलं आणि मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करावी लागली. कोणत्याही मुद्यावर मत व्यक्त करण्यात पुढे असलेल्या नेटीझन्सनी याच मुद्यावरून चांगलीच खिल्ली उडवली आहे. ट्विटर, फेसबूकसह व्हॉट्सअॅपवरही बरेच विनोद फिरत आहेत. 
स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून सभा रद्द झाल्याची घोषणा केली. त्यानंतर अनेकांनी त्या ट्विटवरच खुमासदार सैलीत उत्तर देत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. 
(पेशवाई झोपेने फडणवीस गारद)
 

Web Title: Punekar's chief minister will snag, even on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.