शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पुण्यात भारनियमन सुरू, ऐन सणासुणीत काळात पुणेकर राहणार अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 22:36 IST

राज्यात वीजनिर्मितीत घट झाल्याने त्याचा फटका गेली 12 वर्षे भारनियमनमुक्त असलेल्या पुणे शहराला गुरुवारी बसला. शहराच्या अनेक भागात आज 2 - 2 भारनियमन करण्यात आले.

पुणे : राज्यात वीजनिर्मितीत घट झाल्याने त्याचा फटका गेली 12 वर्षे भारनियमनमुक्त असलेल्या पुणे शहराला गुरुवारी बसला. शहराच्या अनेक भागात आज 2 - 2 भारनियमन करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून भारनियमन केले जात आहे. मात्र पुणे शहर व पिंपरी चिंचवड हे ए व बी गटात येत असल्याने तेथे भारनियमन केले जात नव्हते. पुणे शहरात विविध भागात दोन -दोन तासांचे भारनियमन करण्यात येत होते. मात्र, अधिकृतपणे देखभाल, दुरुस्तीचे नाव दिले जात होते़ पुणे शहरात हे भारनियमन उद्याही सुरु राहण्याची शक्यता आहे.सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले,  कोळसा पुरवठ्यात अडथळा आल्याने वीजनिर्मिती घटल्याचे जेव्हा सांगितले जाऊ लागले, तेव्हाच आपण केंद्रीय कोळसा मंत्रालयाला मेल करून त्याबाबतची वस्तुस्थिती काय याची विचारणा केली होती. कोळशाचा पुरवठा कधी सुरळीत यावर काहीही माहिती देण्यास तयार नाहीत. 

१२ वर्षांनंतर पुणे शहरात भारनियमनपुणे शहरात सुरळीत व अखंड वीजपुरवठा सुरु रहावा, यासाठी २००५ मध्ये पुणे मॉडेल विकसित करण्यात आले होते. त्यासाठी पुणेकरांनी जादा दरही मोजला होता. औद्योगिक संस्थांना जेनरेटरवर वीजनिर्मिती करायला सांगून त्यांना त्यासाठी येणारा जादा खर्च पुणेकर बिलाद्वारे देत होते. या पुणे मॉडेलमुळे २००५ ते २०१० पर्यंत पुणे शहर भारनियमनमुक्त राहिले होते. त्यानंतर आता तब्बल १२ वर्षांनंतर पुणे शहरात भारनियमन होत आहे. ऐन दिवाळीतही पुणेकरांना भारनियमन सहन करावे लागण्याची शक्यता आहे. 

आता तरी खरे सांगाएका बाजूला पंतप्रधान देशभरातील सर्व घरांमध्ये १६ हजार मेगावॉट वीज पुरविण्याची घोषणा करतात, त्याचवेळी देशभरात सर्वाधिक वीजेचा दर देऊनही लोकांना भारनियमन सहन करायची पाळी येत आहे, याला नेमके जबाबदार कोण?. वीजनिर्मिती कशामुळे घटली, याला नेमके जबाबदार कोण हे पारदर्शक कारभाराची भाषा करणा-या सरकारने जनतेला स्पष्टपणे सांगितले पाहिजे. परंतु केंद्र सरकारमधील कोळसा मंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री यावर काहीही बोलायला तयार नाही. विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंचससून रुग्णालयामध्येही साडेतीन तासांचे भारनियमन करावे लागल्यामुळे त्याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. येथे बाह्यरुग्ण आणि दाखल रुग्णांची संख्या मोठी आहे. सुमारे 1300 खाटांच्या या रुग्णालयात अनेकदा क्षमतेपेक्षाही अधिक रुग्ण दाखल असतात. विजेअभावी शस्त्रक्रिया, एमआरआय, सिटीस्कॅन ही यंत्रणा बंद पडते. आधीच या यंत्रणेवर मोठा ताण असून त्यात भारनियमनामुळे एमआरआय व सिटीस्कॅन बंद पडणार असेल तर येथील रुग्णसेवा संपूर्ण कोसळून जाईल, अशी भीती बी. जे. वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केली. ससून रुग्णालयात 29 ऑपरेशन थिएटर आहेत. येथे विविध प्रकारच्या दररोज सरासरी 180 ऑपरेशन होतात. मेडिसिन अतिदक्षता विभाग, ट्रामा आयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू, स्त्रीरोग अतिदक्षता कक्ष, सीव्हीटीएस आयसीयू यामध्ये सुमारे सव्वाशे खाटा असून त्यात 61 व्हेंटिलेटर्स आहेत. अनेक महागडी उपकरणे ही वीज पुरवठ्यावर अवलंबून असतात. उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचे निदान करण्यासाठी अखंडित वीजपुरवठा गरजेचा आहे. त्यामुळे ससून रुग्णालयासाठी एक्स्प्रेस फिडरमधून वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी डॉ. चंदनवाले यांनी केली आहे.