काँग्रेस करणार पुणे मेट्रोचं भूमीपूजन!

By Admin | Updated: December 22, 2016 00:02 IST2016-12-22T00:02:25+5:302016-12-22T00:02:25+5:30

पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरून उद्भवलेल्या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे.

Pune will be the land of Pune Metro! | काँग्रेस करणार पुणे मेट्रोचं भूमीपूजन!

काँग्रेस करणार पुणे मेट्रोचं भूमीपूजन!

>ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. 21 - पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरून उद्भवलेल्या वादात आता काँग्रेसनेही  उडी घेतली आहे. शनिवारी 23 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे भूमीपूजन नियोजित आहे. मात्र त्याआधीच शुक्रवारी पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते मेट्रोचे भूमीपूजन उरकण्याचा घाट काँग्रेसने घातला आहे. पुणे काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती बागवे यांनी दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरून वाद चिघळण्याची शक्यता आहे.  
 

Web Title: Pune will be the land of Pune Metro!