पुण्याला दहशतवादी हल्ल्याचा धोका
By Admin | Updated: September 12, 2016 19:18 IST2016-09-12T19:18:31+5:302016-09-12T19:18:31+5:30
जुन्या मोटारीमधून पुण्यात दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता असून तसा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी पुणे पोलिसांना दिला आहे.

पुण्याला दहशतवादी हल्ल्याचा धोका
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ - जुन्या मोटारीमधून पुण्यात दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता असून तसा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी पुणे पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी शहरातील घर मालकांकडून भाडेकरूंची सविस्तर माहिती मागवली आहे.
तसेच जुन्या नवीन मोटारींची खरेदी विक्री करणारे, इस्टेट एजन्ट यांच्याकडेही चौकशी सुरु आहे. सर्वांना आपापली माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात देण्याचे आदेश पोलीस आयुक् रश्मी शुक्ला यांनी काढले आहेत.
12 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीसाठी हा अलर्ट देण्यात आलेला आहे. गणेशोत्सव, बकरी ईद आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत.