पुण्याची पराभवाची मालिका कायम

By Admin | Updated: August 13, 2014 02:35 IST2014-08-13T02:35:39+5:302014-08-13T02:35:39+5:30

पुणे संघाच्या प्रवीण नेवाळे आणि वजीर सिंग यांनी आपल्या नावाला साजेसा खेळ केला, परंतु तेलगु टायटन्सविरुद्ध ते पराभव टाळू शकले नाहीत

Pune series of defeats continued | पुण्याची पराभवाची मालिका कायम

पुण्याची पराभवाची मालिका कायम

पुणे : पुणे संघाच्या प्रवीण नेवाळे आणि वजीर सिंग यांनी आपल्या नावाला साजेसा खेळ केला, परंतु तेलगु टायटन्सविरुद्ध ते पराभव टाळू शकले नाहीत. तेलगु संघाने मध्यांतरानंतर आक्रमक खेळ करीत प्रो कबड्डी स्पर्धेत पुण्याचा ४२-३६ गुणांनी पराभव केला. तेलगुचा सुकेश हेगडे सामन्याचा मानकरी ठरला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये मंगळवारी या स्पर्धेला पुणेकरांसह रत्नागिरी, सोलापूर, अहमदनगर, नाशिक येथूनसुद्धा कबड्डीप्रेमींनी हजेरी लावत पुणे संघाला जोरदार प्रोत्साहन दिले. आजचा खरा सामना झाला तो पुण्याचा वजीर सिंंग आणि तेलगुच्या राहुल चौधरी यांच्यात. दोघांनीही सुरुवातीला बचावात्मक खेळ करीत बोनस गुण मिळविण्यावर भर दिला. पुणे संघाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत असतानासुद्धा नेवाळे व वजीरच्या व्यतिरिक्त सूर गवसत नव्हता. त्यातच तेलगु संघाचे खेळाडू शांत व नियोजनपूर्वक खेळत होते. त्यांचा बचावसुद्धा भक्कम होता. पाचव्या मिनिटाला पुणे संघावर लोन बसण्याची वेळ आली होती. पण नेवाळे व वजीरने केलेल्या आक्रमक व खोलवर चढायांमुळे पुणे संघाने चोख उत्तर देत त्यांच्यावर लोन चढविला. नेवाळेने आपल्या चढाईत तीन गुण मिळविले. या लोनचा फायदा मात्र पुणे संघाला उचलता आला नाही. लोन बसल्यामुळे चवताळलेल्या तेलगु संघाच्या खेळाडूंनी जास्त आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्याचा त्यांना चार मिनिटांत फायदा झाला. त्यांनी लोन फोडून टाकला. विश्रांतीला खेळ थांबला तेव्हा पुणे संघाकडे २७-२५ अशी आघाडी होती.

Web Title: Pune series of defeats continued