पुण्यातील महिलांसोबतच्या रेव्ह पार्टीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा दोन नंबरचा जावई पोलिसांना रंगेहाथ सापडला आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. रोहिणी खडसेंचा पती प्रांजल खेवलकर याच्यावरील कारवाई ही यंत्रणांचा गैरवापर असल्याची ओरड विरोधक मारू लागले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर आज झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांच्यासाठी हा एक संदेश आहे. चुप बैठो नही तो रेड करुंगा, असा संदेश असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
तर संजय राऊत यांनी एकनाथ खडसे यांनी मुद्दे मांडले त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घालतात. काहीही होऊ शकते. पोलीस आणि त्यांची यंत्रणा बीजेपी विरोधी यांना अशा प्रकारे पकडण्यासाठी आहे. बाकी सरकारमध्ये काहीही काम नाही, असा आरोप राऊत यांनी केला आहे.