पुणे - धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती
By Admin | Updated: July 7, 2016 17:33 IST2016-07-07T17:33:21+5:302016-07-07T17:33:21+5:30
शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणसाखळी मधील पाणलोट क्षेत्रात गुरूवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, दिवसभरात अधून मधून तुरळक पावसांच्या सरींनी हजेरी लावल्याची

पुणे - धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ७ : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणसाखळी मधील पाणलोट क्षेत्रात गुरूवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, दिवसभरात अधून मधून तुरळक पावसांच्या सरींनी हजेरी लावल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने खडकवासला, पानशेत, वरसगाव तसेच टेमघर धरणांचा पाणीसाठा साडे सहा टीएमसीवर पोहचला असून पुणेकरांवर ओढावले वाढीव पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले आहे. या चारही धरणांचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर पोहचला आहे.
शनिवार (दि,२) पासून पुणे शहरा बरोबरच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला होता. बुधवार (दि.६) पर्यंत हा पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे तळ गाठलेल्या या चारही धरणांच्या पाणी पातळी मध्ये लक्षणीय वाढ होण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान, बुधवारी रात्री पासूनच पावसाचा जोर ओसरल्याने पाणीसाठयात होणा-या वाढीचा वेगही मंदावलेला असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण़्यात आले.
=========
कोकणातील पावसाचा आधार
या चारही धरणांमधील पावसाचा जोर ओसरला तरी कोकण घाटमाथ्यावर होणा-या पावसाचे पाणी मोसे खो-यातून पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात येत आहे. त्यातच लवासा मध्ये असलेली धरणेही ओव्हरफूल झाल्याने या ठिकाणी होणा-या पावसाचे पाणीही धरणांमध्ये येत आहे. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतली तरी पाणीसाठा वाढण्यास कोकणातील पावसाचा आधार मिळत असल्याचे चित्र सध्या धरणक्षेत्रात दिसून येत आहे.
==============