पुण्याचा कोल्हापूरला धक्का
By Admin | Updated: May 10, 2017 01:44 IST2017-05-10T01:44:03+5:302017-05-10T01:44:03+5:30
टायब्रेकमध्ये गेलेल्या अंतिम सामन्यात पुणे डीएफए संघाने निर्णायक कामगिरी करत कोल्हापूर डीएफए संघाचा ४-३ असा पाडाव करुन

पुण्याचा कोल्हापूरला धक्का
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टायब्रेकमध्ये गेलेल्या अंतिम सामन्यात पुणे डीएफए संघाने निर्णायक कामगिरी करत कोल्हापूर डीएफए संघाचा ४-३ असा पाडाव करुन पहिल्या फुटबॉल ‘उर्जा कप’ पटकावला. यासह पुणेकरांनी आॅलिम्पियन एस. एस. नारायण चषकावर नाव कोरले. पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या १९ वर्षांखालील टॅलेंट हंट स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तसेच मुलींच्या गटात यजमान मुंबई डीएफए संघाने बाजी मारली.
चर्चगेट येथील कुपरेज स्टेडियमवर झालेला हा अंतिम सामना निर्धारीत वेळेत गोलशुन्य बरोबरीत सुटल्याने टायब्रेकमध्ये गेला. विशेष म्हणजे २० मिनिटांचा अतिरिक्त वेळेतील खेळही गोलशुन्य बरोबरीत सुटला. यानंतर झालेल्या टायब्रेकमध्ये मात्र पुणेकरांनी एकहाती वर्चस्व राखले. पुण्याच्या एड्विन फलेरिओ, विकी पुजारी, ख्रिस उन्नीथन आणि रेयान सचिन यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाचा विजय साकारला.
त्याचवेळी, ब्रायस मिरिंडा याने नोंदवलेल्या ३ गोलच्या जोरावर यजमान मुंबई डीएफए संघाने नागपीर डीएफएचा ५-० असा फडशा पाडून तिसरे स्थान काबिज केले.