शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

अफझल खान वधाचा देखावा दाखवायला पोलिसांनी परवानगी नाकारली; मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 20:58 IST

कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवण्यात नकार दिला असं मनसेचे किशोर शिंदेंनी म्हटलं.

मुंबई - राज्यात सरकार बदलल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झालेत. हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे असं सातत्याने सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र पुण्यातील मनसेचे किशोर शिंदे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. गणेशोत्सवात अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवायला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली असा आरोप शिंदे यांनी केला आहे. 

किशोर शिंदे म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवण्यात नकार दिला. गेल्या २० वर्षापासून संगम तरूण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रसंगावर चलचित्र देखावा आयोजित करतो. जेणेकरून लहान मुलांना इतिहास समजावा. यंदा अफझल खानाचा वध दाखवायचा होता. खानाने देऊळं तोडली. शेर शिवराज सिनेमात हे सगळं दाखवलं आहे. अफझल खान देवमाणूस आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच हिंदुत्ववादी विचारांनी हे सरकार आले आहे. त्यामुळे सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे. गणेशोत्सवात अफझल खानाचा वध दाखवण्यास कसला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं आहे. मनसे आमदार राजू पाटील हेदेखील गृहमंत्र्यांशी बोलणार आहेत. उद्या याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत अशीही माहिती मनसे नेते किशोर शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगून पोलीस चालढकल करत आहेत. सांगलीत कधीकाळी दंगल घडली होती. महाराजांचा इतिहास लपवता येणार नाही. महाराजांचा इतिहास आम्ही दाखवणार आहोत. १०० टक्के लोकांना इतिहास दाखवणार आहोत. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीही चालतील असंही मनसेचे किशोर शिंदे यांनी सांगितले आहे. 

मनसेचा हिंदुत्ववादी बाणा मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदुत्ववादी विचारांचा आवाज बुलंद करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्याचा मुद्दा पुढे आणला. पोलिसांनी अनधिकृत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असं राज यांनी म्हटलं. त्यानंतर भाजपानेही राज ठाकरेंच्या मागणीला प्रतिसाद देत उद्धव ठाकरे सरकार हिंदुत्वविरोधी आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राज्यात बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्ववादी विचार पुढे नेणार असं म्हटलं होतं. त्यामुळे आता मनसेने केलेल्या आरोपावर सरकार आणि गृहमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचे आहे.  

टॅग्स :MNSमनसेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजEknath Shindeएकनाथ शिंदेHinduहिंदू