पुण्यात वडगाव पुलाजवळ डंपरची धडक बसून अपघात, ६ ठार

By Admin | Updated: June 11, 2015 14:41 IST2015-06-11T13:22:17+5:302015-06-11T14:41:58+5:30

पुण्यातील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर एका डंपरची तीन दुचाकी व दोन मोटारींना धडक बसून झालेल्या अपघातात ६ जण ठार तर दोन जण जखमी झाले.

In Pune, near Pune, near Wadgaon bridge, 6 people were killed in a dump | पुण्यात वडगाव पुलाजवळ डंपरची धडक बसून अपघात, ६ ठार

पुण्यात वडगाव पुलाजवळ डंपरची धडक बसून अपघात, ६ ठार

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ११ - शहरातील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर एका डंपरची तीन दुचाकी व दोन मोटारींना धडक बसून झालेल्या अपघातात ६ जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. बाह्यवळण मार्गावरून देहूरोडच्या दिशेने जात असताना वडगाव पुलाआधी हा अपघात घडला. 
 
खडी घेऊन जाणा-या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचे समजते. भरधाव वेगात येणा-या डंपरने सुरूवातील ट्रॅव्हल बसला धडक दिली. बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूच्या झाडाला धडकवली. हा डंपर तसाच वेगाने पुढे गेला. ओम्नीला धडक देऊन ही ओम्नी तशीच पबाजूला रेटत नेली. ही मोटर पुलाच्या बाजूला असलेल्या झाडांमध्ये कोसळली. त्यापाठोपाठ डंपर वरून ओम्नीवरच खाली पडला. सिक्स सीटर व दोन दुचाकीवरही काही भाग पडला. त्यात सहा जण दगावले असून दोन जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: In Pune, near Pune, near Wadgaon bridge, 6 people were killed in a dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.