महापालिकेने घातले पुण्याला ‘खड्ड्यात’
By Admin | Updated: May 16, 2014 04:20 IST2014-05-16T04:20:04+5:302014-05-16T04:20:04+5:30
नवे रस्ते तयार करूनही काहीच दिवसांत झालेल्या दुरवस्थेमुळे महापालिकाच मानवनिर्मित चुकांमुळे पुण्याला ‘खड्ड्यात’ घालत असल्याचे दिसून आले आहे

महापालिकेने घातले पुण्याला ‘खड्ड्यात’
पुणे : डांबरीकरण करताना रस्त्याचे एकावर एक थर केल्याने डेÑनेजच्या जागी झालेले खड्डे, दुभाजकामुळे झेब्रा क्रॉसिंगवर झालेले अतिक्रमण आणि नवे रस्ते तयार करूनही काहीच दिवसांत झालेल्या दुरवस्थेमुळे महापालिकाच मानवनिर्मित चुकांमुळे पुण्याला ‘खड्ड्यात’ घालत असल्याचे दिसून आले आहे. मानवनिर्मित खड्ड्यांमुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागत असून, लाखो रुपयांची उधळपट्टी करूनही चांगले रस्ते दिसेनासे झाले आहेत. निधी संपविण्याकरिता मार्च महिन्यामध्ये रस्त्याची कामे सुरू करण्यात आली. परंतु, त्यानंतर असलेली लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि कामे यांमुळे याकडे दुर्लक्ष झाले. डांबराचे एकावर एक थर करून रस्ते तयार केले जातात. परंतु, तेथील डेÑनेजची उंची मात्र वाढविली जात नाही. यामुळे मानवनिर्मित खड्डे तयार होत आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या खड्ड्यांबाबत तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. जाळीची डेÑनेज रस्त्याच्या कडेला असली, तरी ती रस्त्याच्या पातळीच्या खाली असल्याने वाहनांची चाके या मोठ्या खड्ड्यांमध्ये अडकतात. बहुतांश रस्त्यांवर डेÑनेजची झाकणे रस्त्याच्या मधोमध आहेत. त्यामुळे खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यातून मार्ग काढण्याची कसरत वाहनचालकांना करावी लागते. (प्रतिनिधी)