शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यातूनही मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 13:42 IST

कोरेगाव भीमा प्रकरणात हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना  अतिरिक्त सत्र न्यायाधीश  एस. एम. मेनजोगे यांच्या न्यायालयाने विविध अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता एकबोटे यांची घरी जाण्याची वाट आणखी सुखकर झाली आहे.  

यापुर्वी त्यांना अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून जामीन देण्यात आला आहे. त्याच दिवशी त्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मंगळवारी (१७ एप्रिल) सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी जामीनावर निर्णय राखून ठेवण्यात आला होता.  १ जानेवारीला रोजी कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्ताने वंदन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्यावेळी कोरेगाव भीमा गावच्या हद्दीतील वढु रोड, डीग्रहजवाडी रोड, पुणे-नगर महामार्ग या ठिकाणी उसळलेल्या दंगलीमध्ये दगडफेक, जाळपोळीच्या घटना झाल्या होत्या. त्यामध्ये सर्व मिळून सुमारे ५ कोटी ९४ लाखांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी न्यायालयी परवानगी घेत एकबोटे यांना भादवी कलम ३०७ सह १२० (ब) सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम ३ व ४, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७ अशा विविध कलमानुसार अटक केली होती. सुरुवातीला त्यांची ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. बचाव पक्षातर्फे  अ‍ॅॅड. एस.के.जैन आणि अ‍ॅॅड. अमोल डांगे यांनी त्यांच्या जामिसाठी अर्ज केला आहे. यावर सरकारी पक्षातर्फे  प्रमुख जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार तर साक्षीदाराच्या वतीने अ‍ॅड. तौसिफ शेख, अ‍ॅड. कुमार कलेल यांनी जामीनाला विरोध केला होता. त्यावर आज झालेल्या सुनावणीत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

पत्रकार परिषद न घेणे, सभा न घेणे, सभेत भाषण न करणे, दर सोमवारी शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावणे, न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय भारत सोडून न जाण्याच्या अशा विविध अटींवर एकबोटे यांना अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून यापुर्वीच जामीन मंजूर देण्यात आला होता. दंगलप्रकरणी यांच्यासह शिव प्रतिष्ठाणचे प्रमुख संभाजी भिडे, योगेश नरहरी गव्हाणे, गणेश भाऊसाहेब फडतरे आणि अनिल दवे या पाच जणांवर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.   

टॅग्स :Milind Ekboteमिलिंद एकबोटेBhima-koregaonभीमा-कोरेगाव