शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पुण्यात कमी वजनाची सर्वाधिक बालके, सव्वादोन लाख बालकांचे वजन अडीच किलोपेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:43 IST

गेल्या वर्षभरात राज्यात जन्मलेल्या नवजात बालकांपैकी सर्वाधिक कमी वजनाची बालके पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

- स्नेहा मोरेमुंबई  - गेल्या वर्षभरात राज्यात जन्मलेल्या नवजात बालकांपैकी सर्वाधिक कमी वजनाची बालके पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य माहिती यंत्रणेकडील माहितीनुसार राज्यातील २ लाख १० हजार ४६३ नवजात बालकांचे वजन अडीच किलोपेक्षाही कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. या अहवालाच्या माध्यमातून गेल्या वर्षाच्या तुलनेत जन्मत: कमी वजन असलेल्या बालकांमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०१७-१८ साली राज्यात हे प्रमाण २ लाख ५ हजार ५८२ एवढे होते.सकस पोषण आहाराचा अभाव आणि विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे लहान मुलांमध्ये वजन कमी होण्याचे तसेच त्यांची वाढ खुंटण्याचे प्रमाणही वाढते आहे. या अहवालानुसार, पुण्यात गेल्या वर्षी जन्मलेल्या २१ हजार ४७३ नवजात बालकांचे वजन अडीच किलोपेक्षाही कमी असल्याचे उघड झाले आहे. पुण्यानंतर राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूर या शहरांमध्ये जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण अधिक आहे.मातेचे गर्भावस्थेमध्ये योग्य प्रमाणात पोषण होणे गरजेचे असते. ते न झाल्यास त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या पोषण आहाराच्या योजना जाहीर करत असले तरीही त्याचा लाभ या मुलांना मिळतो की नाही, हा प्रश्न या अहवालातील निरीक्षणातून उपस्थित झाला आहे.याविषयी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सागर शाह यांनी सांगितले की, कमी वजनाचे बाळ, मुदतीपूर्व प्रसूती, श्वसनाचा संसर्ग, कावीळ, जन्मजात विकृती, न रडलेले बाळ अशा नवजात बालकांना वेळीच उपचारांची गरज असते. प्रसूतीनंतरही बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी योग्य पालनपोषण होणे गरजेचे आहे, नाहीतर हीच बालके भविष्यात कुपोषणाच्या श्रेणीमध्ये परावर्तित होण्याची शक्यता बळावते.गरोदरपणात काळजी गरजेचीजन्मत:च बालकाचे वजन कमी असू नये यासाठी मातेने गरोदरपणात काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तक्षयासंबंधीच्या तपासणीबरोबरच मातेने बालकाचे वजन बरोबर वाढते आहे का हे पाहण्यासाठी नियमित तपासण्या करून घ्याव्यात. रक्तक्षय असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लोह व फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या सुरू करणे, प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह अशा घटकांनी युक्त असा पुरेसा आहार घेणे, बाळंतपणासाठी दवाखान्यात वेळेवर नोंदणी करणेही गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयांत बाळंतपणासंबंधीच्या सर्व तपासण्या व उपचार मोफत उपलब्ध आहेत.- डॉ. अशोक आनंद, स्त्रीरोगतज्ज्ञ, विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र