पुण्यात ज्येष्ठ नागरिकावर गोळीबार, एकाला अटक
By Admin | Updated: June 2, 2016 20:40 IST2016-06-02T20:27:18+5:302016-06-02T20:40:12+5:30
बावधन येथील व्हीआयटी कॉलेज समोर एका 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले.

पुण्यात ज्येष्ठ नागरिकावर गोळीबार, एकाला अटक
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 2 - बावधन येथील व्हीआयटी कॉलेज समोर एका 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गोळीबार करणार्या व्यक्तीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
दत्तोबा भागोजी वेडेपाटील (60, रा. बावधन) असे जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश जग्गनाथ दगडे पाटील (55) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे व्हीआयटी कॉलेज समोर गुरुवारी दुपारी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे काम सुरु होते. ही कारवाई दत्तोबा वेडेपाटील यांच्यामुळे झाली असल्याचा राग प्रकाश दगडे यांच्या मनात होता. कारवाई सुरु असतानाच दगडे पाटील यांनी दत्तोबा वेडेपाटील यांच्यावर गोळीबार करून जखमी केले. त्यांना लगेचच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे बावधन परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी दगडेपाटीलांना अटक केली.