पुणे : जातपंचायतीच्या त्रासाला कंटाळून इसमाची आत्महत्या
By Admin | Updated: August 29, 2016 10:45 IST2016-08-29T10:45:38+5:302016-08-29T10:45:38+5:30
जातपंचायतीच्या त्रासाला कंटाळून एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील मुंढवा परिसरात घडली आहे.

पुणे : जातपंचायतीच्या त्रासाला कंटाळून इसमाची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २९ - जातपंचायतीच्या त्रासाला कंटाळून एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. अरुण किसन नायकु (वय ४७) असे मृत इसमाचे नाव असून ते वीर शैव लिगायत गवळी समाजाचे आहेत.
अरूण यांना दोन वर्षांपूर्वी म्हणजे १६ डिसेंबर २०१४ साली जाती बाहेर काढण्यात आलेले होते. त्यांना कोणाशीही बोलता येतत नव्हते , ना कोणाशी कोणताही संबंध ठेवता येत होता. दरम्यान कालते एका लग्नाला गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी आपल्याला अजून किती दिवस बाहेर ठेवणार? आता तरी जातीमध्ये घ्या अशी विनवणी संबंधितांना केली. मात्र त्यांनी नायकू यांचे काहीच न ऐकता अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला. यामुळे हताश मनस्थितीतील नायकू यांनी राहत्या घरात रात्री आत्महत्या केली.