पुण्यात कुख्यात गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून
By Admin | Updated: June 21, 2014 00:25 IST2014-06-21T00:25:11+5:302014-06-21T00:25:11+5:30
कुख्यात गुन्हेगार परशुराम उर्फ परशा उर्फ आबा पांडूरंग जाधव (39) याचा जागा दाखवण्याच्या बहाण्याने निमर्नुष्य परिसरात नेऊन गोळ्या झाडून खून करण्यात आला.

पुण्यात कुख्यात गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून
>पुणो : शहरातील कुख्यात गुन्हेगार परशुराम उर्फ परशा उर्फ आबा पांडूरंग जाधव (39) याचा जागा दाखवण्याच्या बहाण्याने निमर्नुष्य परिसरात नेऊन गोळ्या झाडून खून करण्यात आला. पुणो सातारा रस्त्यावरील गुजर निंबाळकरवाडीमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशावर खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्रसंबंधीचे गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्या विरुद्ध सहकारनगर स्वारगेट खडक निगडी फरासखाना कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूरमध्ये एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याला अनेकदा अटकही करण्यात आलेली होती.
शुक्रवारी दुपारी त्याच्याकडे तीन ते चार जण गेले होते. जागा दाखवण्यासाठी त्याला घेऊन हे सर्वजण निंबाळ्करवाडी येथे गेले होते. त्याठिकाणी आधीपासून तीन ते चार जण आलेले होते. जागा दाखवल्यानंतर ही जागा एकत्र विकसित करण्या संदर्भात त्यांच्यामध्ये बोलणी झाली. जागा बघून निघत असतानाचपरशावर बेछुट गोळीबार केला. गोळ्या त्याच्या डोक्यात लागल्या. (प्रतिनिधी)