पुण्यात आयएएस अधिकारी गजाआड
By Admin | Updated: March 20, 2015 01:25 IST2015-03-20T01:25:15+5:302015-03-20T01:25:15+5:30
चॉकलेट आणि खाऊच्या आमिषाने शाळकरी मुलींना बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या मारूती हरी सावंत (५८) यास पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

पुण्यात आयएएस अधिकारी गजाआड
मुलींशी अश्लील चाळे : कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकाचे कृत्य
पुणे : चॉकलेट आणि खाऊच्या आमिषाने शाळकरी मुलींना बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या मारूती हरी सावंत (५८) यास पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. तो भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असून सध्या महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा महासंचालक आहे.
सावंतच्या सासऱ्याचा सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक फ्लॅट असून आठवड्यातून दोन दिवस तो या फ्लॅटवर रहाण्यासाठी येत होता. त्याचे कुटुंबीय शिवाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. पोलीसांनी केलेल्या चौकशीनुसार, सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या अल्पयवीन मुलींना सावंत खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून त्यांचा गैरफायदा घेत असे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.
सावंत याच्या चाळ्यांचा चार विद्यार्थिनींना असह्य त्रास झाला. शाळेत दर मंगळवारी होणाऱ्या समुपदेशन तासात त्यांनी हा सर्व प्रकार शिक्षिकेच्या कानावर घातला. हादरलेल्या या शिक्षिकेने त्वरित ही माहिती मुख्याध्यापिकेला सांगितली. या चार मुली १० ते १२ वर्षांच्या असून दुसरीमधील दोन आणि तिसरी व सातवी इयत्तेतील प्रत्येकी एका मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलीस तपासासाठी सावंत याच्या फ्लॅटवर गेले असता तो मद्यप्राशन करीत बसला होता,
अशी माहिती सहपोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. लैंगिक छळाच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला गुरूवारी रात्री अटक केली. (प्रतिनिधी)
च्मारुती सावंत हा मुळचा कोल्हापूरचा असून महसूल सेवेतून बढती मिळून आयएएस केडरमध्ये दाखल झाला आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत जून २०११पासून महासंचालकपदावर कार्यरत आहे. कार्यालयात न येता घरीच फाईल्स मागवून घेत असल्याच्या तक्रारीही त्याच्याबद्दल होत्या. याबद्दल जाब विचारणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याने शिवीगाळ केली होती. त्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.