पुणे - बंगळुरु हायवेवरील अपघातात पालकांसह मुलगी ठार
By Admin | Updated: March 22, 2016 09:53 IST2016-03-22T08:00:42+5:302016-03-22T09:53:27+5:30
पुणे - बंगळुरु हायवेवर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि टेम्पोच्या झालेल्या धडकेत पालकांसह मुलीचा मृत्यू झाला आहे

पुणे - बंगळुरु हायवेवरील अपघातात पालकांसह मुलगी ठार
>
ऑनलाइन लोकमत -
कोल्हापूर, दि. २२ - पुणे - बंगळुरु हायवेवर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि टेम्पोच्या झालेल्या धडकेत पालकांसह मुलीचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. आज सकाळी मंगरायाची फाट्याजवळ हा अपघात झाला. बेळगावहून पुण्याला जाताना असताना या कारचा अपघात झाला.
संतोष देवाडीगा (वडील , पौर्णिमा संतोष देवाडीगा (आई) आणि अनुष्का संतोष देवाडीगा (मुलगी) यांचा या अपघातात मृत्यू झाला असून हे सर्वजण मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी आहेत. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. दत्तात्रय देवाडीगा, सुप्रिया देवाडीगा आणि अविनाश देवाडीगा यांच्यासह चालक कपिल देवाडीगा जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. जखमी झालेले सर्वजण पुण्याचे रहिवाशी आहेत.