पुणे - घोडेवाडी-उंबरवाडी रस्ता गेला वाहून
By Admin | Updated: September 3, 2016 22:35 IST2016-09-03T22:35:38+5:302016-09-03T22:35:38+5:30
घोडेवाडी ते उंबरवाडी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्ता वाहून गेल्याने या रस्त्यावर अवलंबून असणा-या परिसरातील सुमारे ५०० आदिवासी नागरिकांवर पायपीट करण्याची वेळ आली आहे

पुणे - घोडेवाडी-उंबरवाडी रस्ता गेला वाहून
>- ऑनलाइन लोकमत
आदिवासी भागातील वाड्यांचा संपर्क तुटला : पायी करावा लागतो प्रवास, दुरुस्तीची मागणी
डिंभे, दि. 3 - घोडेवाडी ते उंबरवाडी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्ता वाहून गेल्याने या रस्त्यावर अवलंबून असणा-या परिसरातील उंबरवाडी, घोडेवाडी, काळवाडी व माळवाडी या आदिवासी वाड्यांवस्त्यावरील सुमारे ५०० आदिवासी नागरिकांवर पायपीट करण्याची वेळ आली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील बोरघरच्या घोडेवाडी ते उंबरवाडी या रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. आधीच कच्चा असणारा हा रस्ता या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्त्यावर दगडगोटे वाहून आले आहेत. अनेक ठिकाणी तर संपूर्ण रस्ताच वाहून गेल्याने जागोजागी रस्त्यावर घळी पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अतिवृष्टीमुळे रस्ताच वाहून गेल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. यामुळे या परिसरात असणाºया उंबरवाडी, घोडेवाडी, काळवाडी व माळवाडी येथील रहिवाशांची दळणवळणाची गैरसोय झाली आहे. आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. तर, या भागात राहणाºया नागरिकांना प्रवासासाठी ४ ते ५ कि.मी.वर असणाºया उंबरवाडीपर्यंत चिखल तुडवीत जावे लागत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने दररोज पायपीट करून या वाड्यावस्त्यांवरील नागरिक मेटाकुटीला आले असून, उंबरवाडी, घोडेवाडी, काळवाडी व माळवाडी येथील नागरिकांची पायपीट थांबविण्यासाठी बोरघरच्या या वाड्यावस्त्यांवर जाणाºया रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील नागरिक व अनिल वालकोळी यांनी केली आहे.